Friday, November 17, 2017

रंग सारे झाले दंग

रंग सारे झाले दंग 

रंग सारे झाले दंग ,
बघून तुझे अपरूप रूप
गिरवू कशा भावना ,
त्यांतर तुजवरी लुब्ध

नको फिरवू कटाक्ष मजवरी
गालात छद्मी हसून
खरेच भाळलो तुजवरी मी
मनात सारे ते लपून

गोंधळले  अग  रंग माझे
एकमेका ते झोम्बती
तारामबल उगीच झाली
नाही धुसपूस संपली

तू खुद्कन हसली तेव्हा
क्षणभर सगळे भाम्बावलो
स्वच्छ ब्रश फिरवून
अंतरी सारे खदखदलो

हावरटा परी ब्रश फिरला
चुंबुनी सगळ्या अंगा
असते कुणाचे भाग्य असले
मज काय ते झुरन्या विना