Saturday, November 18, 2017

वळणावरील चाफ्यास


चाफ्याचे फूल के लिए चित्र परिणाम


वळणावरील चाफ्यास

गळुन पडलेल्या चाफ्याला मी,
नकळत वळणावर तुडवलं..
तर वेड्याने पावलांना,
सुगंधात बुडवलं....❤

======
वाटले असेल जणू त्यांना
फुलपाखरूच आले
चुंबुनी पावलांना
प्रेम विभोर कि झाले

पाहिले असेल स्वप्न कदाचित
जीवन कृतकृत्य झाले
रंग माझा तुला दिला
बदल्यात कोमल तुझी पावले

नको अव्हेरुस मला आता
हृदयाशी घे उचलून
हुंदके जमलेत प्रेमाचे
तुज साठी कळवळून

अश्रू मला तुझी नको
हवे खुदकन गाली हसणे 
सुगंध प्रेमानंदे तुला दिला 
माझे इवलेसे कि मागणे