Saturday, November 18, 2017

ओशाळल्या भावानी

ओशाळल्या भावानी

ओशाळल्या भावानी  तुझ्या , लक्ष माझे वेढले  ,
लाजऱ्या गालातूनी , भाव सोज्वळ उमटले ,

तमा न कुणा नाजूक तेचि , नाही कधी दाखविले ,
जयश्री कडून अचूक वेचले , धन्य त्या डायरेक्टर चे  ,

निरागस तुझ्या नजरेत, माझे मन वेडे गुंतले ,
नुमजे मजला काय करावे ,  का नुसते गुंफले

स्वप्नील पापण्यात कसले , स्वप्न तुही पाहिले ,
म्हणून काय डोळे तुझे , वाटती असे पेंगुळले ,