Saturday, November 25, 2017

मीच तुझी जिवलग

मीच तुझी जिवलग 

मीच तुझी जिवलग 
नकोरे विसरुस मला 
प्रीती खरी तुजवरी 
नको अव्हेरुस मला

पोळले मनात सारखे 
स्वप्नांत तुला पाहुनी 
वरले तुलाच तेव्हा
 मनी इच्छा धरुनी 

डोळ्यात तुझ्या पाहिले  

जाणली प्रीती अंतरी 
शिणले मन माझे 
विरहाचा घास गिळूनी  

तू असेच रागे भरता 
मज कोण असे सोबती
जाऊ नको विरहात 
ये ना पुन्हा परतुनी