Friday, November 17, 2017

वसते तू हृदयात माझ्या वसते तू हृदयात माझ्या

वसते तू हृदयात माझ्या
हुरहुरते प्रति क्षणात किती
डोळे तुझे शोधती कोठे
भावनांच्या कोठाऱ्या वरती

ना सरते कधी पिउनि सगळे
नयनातील अतृप्त तृष्णा
तरीही माझी क्षुधा अपुर्या
ठाव तुझा काळजाचा शोधण्या

घुसळून सार्या मन्मनाला
तरीही उरते तृप्ती अपुरी
म्हणना जरा पुरे अता
मी तुमची पुरती सगळी

शोधती तुला आर्त तृष्णा
ना गवसली तू अजून कशी
वेडावतो काळ मजला
ध्यास तुझा हा बावनकशी

हुरहूर ले ल्या वेड्या मनाला
साद अजून नाही आली
असेल तू जेथे प्रिया
नजरेत तरी भेट मजशी