Thursday, November 16, 2017

कटाक्ष तुझ्या नायनाचा

कटाक्ष तुझ्या नायनाचा 

कटाक्ष तुझ्या नायनाचा
घायाळ करी मजला
हे अधरावरील लुप्त हास्य
काय म्हणते आजला

उभार उरातील स्पंदने
कासावीस करिती हृदया
बंधनात बांधले वेसणीत
गिळून लाजेचा आवळा

जणू मेघ सजविती चंद्रा
तसेच मुख लपले केस वलयी
प्रकाश असुदे स्मिताचा
जशी खुदकन खळी उमलली

स्वप्नात सजेल सारे
त्या मखमली दुनियेत
ना बंध निर्बंध कुणाचे
गुंफतील स्वास समवेत