Monday, November 27, 2017

माझ प्रेम


 माझ प्रेम 

मनाच्या  पल्याड 
तुझ प्रेम लपविले 
संकोचान अडविल 
प्रेमाची किलबिल    

गोबर्या गालावर 
खळीने बांधल घर 
हसताना थोड जरी 
डूबते मन सगळ    

तुझी नजर चोरटी 
गाली हसून वळते 
तुझ्या मनातल सार
मजला कळून जाते  

गुपचूप काहीतरी 
बोलावेसे वाटते 
समोर येता जवळी 
सार विसरायला होते 

गळा मिळते तेव्हा 
जणू आभाळ लवते 
जगातलं सार काही 
मिळाल्याच वाटते