Thursday, November 16, 2017

नको आठवूस तू मजला


नको आठवूस तू मजला

नको आठवूस तू मजला
वेदना होती मनाला
असुदे एकटा मी विरहात
स्मरीन  तुजला मन्मनात

क्षितिजा काठी किती फिरलो
कोवळ्या रंगात भिजलो
संध्येशी करुनि गुजगोष्टी
गार्हाणे तुझे मी वदलो

रंगात गंध भिजला
मोहरला तनी  धुंदला
क्षण एक तो प्रीतीचा
अनंतास वेढून उरला

प्रीती अशी हि जीवाची
कुणा ना कधी कळायची
वेडावली सारी श्रुष्टी
अशी प्रेमाची गुंफण त्याची

ना कळले कधी तुझे रुसणे
का वेगळेच ते बहाणे
ना फुलासवे कधी गुंतलो
का भ्रमर म्हणुनी हिंणलो ?
========


ना  करना याद मुझे
गम उठाने दो मुझे
भाति मुझे बिरही जिंदगी
याद करूँगा हर घडी

कितने किनारे ढूंढे
धुंदले शाम को मिले
संध्यासे कहके कहानी
मेरी अनसुनी जिंदगी