Saturday, December 2, 2017

थेम्ब टपकती

संबंधित इमेज
टीप टीप इवले थेम्ब टपकती
पाण्या वरती उसळून नाचती
अंगा भोवती वलय धरुनी
जैसा परकर वेढुन भोवती

गिरकी सभोवार फेर धरुनी
हैवे वरती किंचित तरंगुनी
लहंगाचा फेर करुनी
परत जलधात जाते मिळुनि
विलोभनीय ते त्यांचे नाचणे
वाटते राहावे बघत सारखे
टपा वरती ताल धरती
पानावरुन हळू ओघळती

रिमझिम त्याचा सूर वेगळा
सरी वर सरी पाठलाग वेगळा
पाण्यावरती वलय धरती
पावसाचे गाती गाणी