Tuesday, December 5, 2017

प्रीती आधी


प्रीती आधी 

माझ्या प्रीतीचे गर्हाणे 
नाही तुला सांगणार सजणी 
मनात झुरून मन्मनात  
कुढणार सजणी  

तू भावली अशीकशी 
अजून नाही मला कळल 
मनात सारख सारख 
तुझ प्रेम दाटून राहील 

केव्हा इकडे तिकडे 
मन पाखरू रेंगाळते 
तुझ्या अवती भवति 
सारख तुझाकडे झेपावते 

तू लाजरी साजरी कशी 
अशीकशी मला गावली 
अजून तू माझ्या प्रेमात 
कशी का नाही डोकावली