Saturday, December 2, 2017

पारिजातकाला


parijaat fule के लिए इमेज परिणाम

पारिजातकाला 

कसा परमानद उतु गेला
पारिजातकाला पहा जरा
कळी फुलून ढिली पडली
बघा धुंद किती झाला

गळीत गात्र झाला किती
आनंद धुंदी सहवेना
प्रत्येक कळी खुलून फुलली
आनंदाचे उसासे धरवेना

मुग्ध झाला पारिजात
डोलायची ना सवड त्याला
डुलता कळी कलंडली
फुल होता होता ओघळली

डाळिंबी देठ धरुनी
आनंदाच्या मोहात पडली
ओसंडाला गंध हृदयीचा
सुप्तावस्थेत जाऊन दडली

साखर झोपेत असता सगळे
स्व स्वप्नात कि सगळे दंगळे
नाही कुणी चाहूल घेत बघुनी
असा प्राजक्त प्रेमात  दंगला