Thursday, February 22, 2018

नच मोहित करू मजला


Photo
नच मोहित करू मजला

नच मोहित करू मजला 
जीव कासावीस कि झाला 

मंद हास्य गाली उधळून 
हळूच लपून खळीला बिलगून
नजरेचा कटाक्ष तिकडे 
अन लक्ष सारे इकडे मजकडे 

गोजिरवाण्या मुखा भोवती 
वलय प्रीतीचे तरी घोटाळती 
आनंदाचा उमाळा धरुनी 
कोठवर तू अशी उभी सजणी 

उगीच कर ते माथी शृंगारती 
उंगलीचे पद-नृत्य करिती 
धपापणारे उर स्पंदने 
प्रेमा साठी काय खुणविती ?

अलंकार हि तुज संग लाजले 
संकोच धरून स्वास धपापले 
आलिंगन तरी दे जवळ येऊनि 
हृदय मजवरी मोकळे करुनि