Friday, March 2, 2018

मी पाहिले तुला गुपचूप

मी पाहिले तुला गुपचूप

मी पाहिले तुला गुपचूप
नजरेची करून उघडझाप
अन तू उभीच होते चूप

कावळ्याच्या नजरेनं
लांडग्याचे लालसेने
टिपलंय तुला मी खूप

तुझं खुदकन हसण
म्हुरका वाईच घेणं
मला भावलय लैच तूच

तुझ्या टपोर्या डोळ्या मंधी
मी झालाय कि नजर बंदी
तुझ्या लावण्यां झालोय गडप

गोबर्या सफरचंदी गाली
खळी सजविली अधोमधी
कधी ना राही चिडीचूप

झटका घेऊनि मानेचा
फटका तुझ्या वेणीचा
अन तिरसया नजरेचा कैफ