Saturday, March 3, 2018

भांडण चिमण्यांचे

भांडण चिमण्यांचे 

नका चिमण्या भांडू आता
सोडा ना पिच्छा
चिमणी ज्याची निवड करेल तो
होईल तिचा चिमणा

इवली तिची चोच चिमुकली
तुम्हाला कि भावते
तिच्या साठी आणा अळी
तिला ते खूप आवडते

घरटे सुद्धा सुरेख असावे 
मऊ मऊ गवताचे 
इवली पिल्ले जसे मावतील 
असावे खिडक्या दरवाजे

नका सतावू पुन्हा तिला 
खोटी चोच भरवून 
पंख तिचे फडफडून दमले
सारखे तेच कवटाळून