Saturday, March 24, 2018

चंद्र तो हा एकटा


Photo


चंद्र तो हा एकटा 

चंद्र तो हा एकटा चंद्रिका हि मधुमती
निल प्रकाशात न्हाली दिव्य तिची कांती

सरिता हि संथ विहरते त्याच काठी हि उभी
निरव शांती मुखावर दृष्टी चिन्मय विभावरी

हंस विहरे सोबतीला जणू कि जलपरी आली
चंद्र चांदणे अन शोभले चांदण्यांची  महाराणी

लावलवतो चंद्र प्रकाश हा मुखावर शोभे सुंदर
प्रीती उभरते मनी माझ्या सारे सोज्वळहे बघून

सरिताकिनारा आसुसला येई परी ती मजकडे
मोहित सारे दृश्य झाले मन त्यात वेडावले