Sunday, April 1, 2018

कधी येशील ग तू परी " मीनाकुमारी"

कधी येशील ग तू परी " मीनाकुमारी"

असावी तुजपरी जीवनात सुंदर नवरी 
जी ओशाळुन लाजेल नेहमी नवथर परी  
अशी आस दिलीस तू मनातल्या मनी 
म्हणून विसरतील कसे तुला अंग मेहेजबीन ........ 1

सोज्वळता हि तुझी नेहमीची दासी 
मितभाषी वाणी तुझी त्यात लपलेली ख़ुशी 
सौम्य ते स्मित तुझे कसे गाली साजे 
पूर्ण खुलण्या विना सगळं चेहरा बोले..................2

सहनशील वागणे तुझे नेहमीची रीती 
दुधात साखर कि काय सर्वावरी प्रीती 
कधी ना बोले मनातही कुणा विरोधी 
अशी अजात शत्रू परी तुझी होती गोडी ................3

उदासी ने कधी तुझं साथ नाही सोडली 
प्रेमाने हि  तुला खूप जीवनात  रडवले 
भूमिकेत दिसावे म्हणून तुला असे छेडले 
कधी फेडतील पाप हे मीना सुद्धा म्हटले .................4

भूमिकेत वावरली तशी जीवनात सारखी 
तेच तुझे जीवन झाले घरी अन दारी 
लुभावले तू सार्या सार्या जगाला भारी 
वाट पाहती तुझी सारे कधी येशील ग तू परी .................5

तेरे जैसी जीवन मे रहे हुसनवाली दुल्हन 
जो शरमाये बहोत जैसी नई कोई मेहमान 
ऐसी आसा दिलायी तुने मनके मन  मे 
कैसे भूलेंगे तुझे ो मेहजनिन जीवन में