Wednesday, April 11, 2018

वेडी वेल


Related image


वेडी वेल

विरळ विरळ पाने तुझी गार गार हिरवी
फुलेही कोमल कोमल नाजूक साजूक इवली
लचकत मुरडत चाल तुझी वेढुन उभ्या वृक्षा
बिलगून असते तू सदोदित कुणाची नसे तमा

गर्व तुझा आणिक शोभतो फुलती जेव्हा काळ्या
दिमाखाने डोलते भारी मुरका घेशी वळून गळा
फुलपाखरे अन भ्रमर लोचट येति तुजकडे पाहुणे
भिंगरे पक्षी, मदमाशी कामे त्यांची मध चोरणे

भ्रमर जेव्हा लपतो बाई तुझ्यालाडक्या फुलात
काय करते तेव्हा तू तर डोलते मोठ्या तोर्यात
फळे जेव्हा मिळती मोठे भ्रमराचे ते सारे देणे
निलाजरी तू अशी ग कशी जवायाचे पोर पाळणे