Monday, April 9, 2018

पंढरीचा राजा विठ्ठल माझा

Related image


पंढरीचा राजा  विठ्ठल माझा
नाही तो कुणाचा सोडून मी ही

आलिया नगरी  दिंडी बावरी
सुबुद्धीचे डेरी    हेच मंदिर
भावची शिदोरी   लाडके विठ्ठले
मन हे भाळले  तुझे चरणी

मन हि पंढरी  आत्मा विठ्ठल
मार्ग हावर्तुळ   शेवटी तुझे ठायी
जावे मी कोठे राहावे कोठे कोठे
नाही ठाव मोहें  फक्त तुझे देठी

तुझे गणगोत  हे सारे भक्त
मी कोण त्यात  हींण  पामर
सांभाळ रे माझे कर्म दुष्कर्म
पाळीला ना धर्म  हिण  कुर्मी

आठव तुझी रे  मणी उमलते
नाही राहावत  तुझ्या विना
बावळा मी कोण  तुझा मी कोण
मला नाही जाण  तूच माझा

काय सांगू देवा मी माझे गार्हाणे
मन हे भटकते  रानोरानी
परी तूच मणी राही सदोदीत
नाही लागे चित्त देशो गणी

गुंतला गोतावली ज्ञानियाच्या दिंडी
मृदूंगाच्या ध्वनी सारे नाचती दंगूनी